हेल्पलाईन क्रमांक केले प्रसारित
अभिनेत्री दीपिका पदूकोन नैराश्यविरोधी लढाईत नेहमीच सहभागी होत आली आहे. मानसिक आरोग्यावरून अधिक जागरुक असण्याची गरज आहे. सद्यकाळात मानसिक आरोग्याबद्दल उघड चर्चा व्हायला हवी असे ती सांगते. संकटकाळात मानसिकदृष्टय़ा त्रस्त होणाऱया लोकांसाठी दीपिकाने व्हेरिफाइड मेंटल हेल्थ हेल्पलाइन क्रमांक प्रसारित केले आहेत.
मी आणि माझे कुटुंब मिळून लाखो लोक या विषाणूपासून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा स्थितीत भावनात्मकदृष्टय़ाही मजबूत राहणे विसरू नका. तुम्ही एकटे नाही, आम्ही सर्व सोबत आहोत. मानसिक आरोग्यही आम्हाला गांभीर्याने घ्यावे लागेल असे दीपिकाने म्हटले आहे.
दीपिका सोशल मीडियावर नैराशग्य आणि मानसिक आरोग्यासंबंधी जागरुकता फैलावण्याचे काम करते. द लीव्ह लव्ह लाफ फौंडेशनची दीपिका संस्थापिका आहे. हे फौंडेशन लोकांना मानसिक आरोग्यासंबंधी जागरुक करण्याचे काम करते.
दीपिका लवकरच शाहरुख खान आणि जॉन अब्राहम यांच्या पठाण चित्रपटात दिसून येणार आहे. दीपिका आणि शाहरुखला पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.









