ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण व्यवहार देखील बंद आहेत. दरम्यान, आज मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची आज पुण्यतिथी आहे.
मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवहार ठप्प असल्याने यावर्षी दीनानाथ मंगेशकर यांच्या पुण्यिथीनिमित्त कोणताही कार्यक्रम होणार नाही. त्यामुळे ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी आपल्या वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त एका संस्थेला आर्थिक मदत करत वडिलांना श्रद्धांजली अर्पित केली.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, लता मंगेशकर यांच्या वडिलांची आज पुण्यतिथी आहे. त्याच बरोबर आपला देश संकटात असल्याने मंगेशकर कुटुंबीयांनी यंदा कोणताही कार्यक्रम आयोजित न करता एका संस्थेला 15 लाखांची मदत देऊ केली आहे.
या बाबत बोलताना लता मंगेशकर म्हणाल्या की, आज माझे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची 78 वी पुण्यतिथी आहे. मात्र, देशावर कोरोनाचे संकट असल्यामुळे यंदा आम्ही कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करू शकलो नाही. याचं मला दुःख आहे. वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त आम्ही दीनानाथ फौंडेशनच्या वतीने प्रीती पाटकर यांच्या प्रेरणा फाऊंडेशनला पाच लाख रुपये आणि माझ्या कडून दहा लाख रुपयांचा निधी देत आहे.
दरम्यान, याआधी लता मंगेशकर यांनी 25 लाखांची मदत केली होती. त्याानंतर आज पुन्हा त्यांनी पुन्हा एकदा 15 लाखांची मदत दिली आहे









