ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मे महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यासाठी सर्वपक्षांकडून तयारीही सुरू आहे. मात्र, या राज्यातील राजकीय समीकरणे एवढी बदलली आहेत की, मागील दीड वर्षात तृणमूल काँग्रेसचे 6 खासदार आणि 14 आमदार पक्ष सोडून गेले आहेत. त्यामधील 4 खासदार आणि 14 आमदारांनी भाजपात गेले आहेत. दोन खासदारांनी मात्र अद्याप कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही.
बंगालमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या काही महिने अगोदर सर्वप्रथम मुकुल रॉय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि नंतर अनुपम हजारा, सौमित्र खान इ. दरम्यान, आमदार अर्जुन सिंहही भाजपमध्ये गेले.
बंगालच्या 294 सदस्यांच्या विधानसभेची निवडणूक एप्रिल-मे महिन्यात होणार आहे. निवडणुकीपूर्वीच ममता सरकारच्या अडचणी वाढत आहेत. पक्षाचे अनेक नेते ममता बॅनर्जींना लक्ष्य करून बंड करत आहेत. त्यामुळे तृणमूलमधील गळती रोखण्याचे मोठे आव्हान ममता बॅनर्जींसमोर आहे.









