वार्ताहर / बांदा
बांदा बाजारपेठेत रस्त्यावर सापडलेली सोन्याची किमती वस्तू मूळ मालकाला परत देणाऱ्या बांदा येथील दीक्षा सावंत या युवतीचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.
या बाबतची हकीकत अशी की आज सकाळी एक व्यक्ती लग्नसमारंभराठी सोन्याचे मंगळसूत्र खरेदीसाठी आली होती. सोबत इतरही नातलग होते. बाजारपेठेतील सराफाकडून सोन्याचे जवळपास दीड ते दोन लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र खरेदी केल्यानंतर इतर समान खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत फिरताना मंगळसूत्राची पर्स हातातून खाली पडली. मात्र संबंधितांच्या सदरील घटना लक्षात आली नाही.
सदरील घटना दीक्षा जनार्दन सावंत हिच्या दुकानासमोर घडली. काही वेळानंतर रस्त्यावर कोणाची तरी पर्स सांडल्याचे तिच्या लक्षात येताच सदरील पर्स बघितली असता आत मंगळसूत्र या पावती सापडली.
पावतीवरून तिचे वडील जनार्दन सावंत यांनी संबंधित सराफाकडे याबाबत चौकशी केली असता संबधीत वस्तूचा मालक सापडून आला. असता वस्तू ताब्यात देण्यात आली. आजच्या या जमान्यात एवढी किमती वस्तू संपर्क करून त्या मालकाला कोणत्याही अपेक्षेशिवाय देणाऱ्या दीक्षा सावंत हिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या बाबत बोलताना बांदा व्यापारी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद पावसकर म्हणाले की, बांदा बाजारपेठेची विश्वासार्हता तिच्या वागण्यात दिसली हीच या बाजारपेठेची ओळख असल्याचे सांगताना तिचे कौतुक केले. कारण फक्त दोन दिवसावर लग्न कार्य असताना सांडलेले मंगळसूत्र मिळाल्याने त्या कुटुंबातिला व्यक्तींनाही आनंद झाला होता.
Previous Articleराज्यातील अनेक हॉटेल, रेस्टॉरंट झाकण्यास सुरुवात
Next Article जमावबंदी प्रकरणी म्हापशात सहा जणांना अटक सुटका









