बेंगळूर/प्रतिनिधी
टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दिशा रवीला अटक करण्यात आली होती. या अटकेबाबत अधिवक्ता, शेतकरी गट, कामगार संघटना आणि इतरांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी सकाळी कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली आणि दिल्ली पोलिसांद्वारे पर्यावरणवादी कार्यकर्त्या दिशा रवी यांच्या कथित गुन्हेगारी अटक प्रकरणावर कारवाईची मागणी करणारे निवेदन सादर केले.
दिशा रवी यांच्याविरूद्ध द्वेषपूर्ण ट्विट केल्याबद्दल हरियाणाचे मंत्री अनिल विज यांच्याविरोधात एफआयआर नोंदविण्यासंदर्भात गृहमंत्र्यांनाही या शिष्टमंडळाने मागणी केली.









