वृत्तसंस्था/ रिगा (लॅटव्हिया)
येथे सुरू असलेल्या फिडे ग्रॅण्ड स्विस खुल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या द्रोणावली हरिकाला पोगोनिनाने बरोबरीत रोखले तर दुसऱया एका लढतीत भारताच्या दिव्या देशमुखने लॅटव्हियाच्या गोलेस्टाचा पराभव करून पूर्ण गुण वसूल केला. पुरूषांच्या खुल्या विभागात भारताचा ग्रॅण्ड मास्टर के. शशीकिरणने रशियाच्या ग्रॅण्डमास्टर फेडोसिव्हचा पराभव केला.
रशियाच्या पोगोनीनाविरुद्ध हरिकाने इटालियन पद्धतीचा अवलंब करताना शानदार विजय नोंदविला. या विजयामुळे हरिका गुणतक्त्यात अन्य 3 स्पर्धकासमवेत 3.5 गुणांसह संयुक्त दुसऱया स्थानावर आहे. दुसऱया एका सामन्यात भारताच्या दिव्या देशमुखने लॅटव्हियाच्या गोलेस्टाचा 49 व्या चालीत पराभव केला. या विजयामुळे देशमुखने दोन गुण मिळविले आहेत. आर. वैशाली आणि अगरवाल यांनी आपले सामने बरोबरीत राखले. गुणतक्त्यात वैशालीने अडीच गुण तर अगरवालने तीन गुण नोंदविले आहेत. पाचव्या फेरीअखेर स्पर्धेच्या गुणतक्त्यात पाच खेळाडूंनी प्रत्येकी समान चार गुणांसह संयुक्त आघाडी मिळविली आहे.
पुरूषांच्या खुल्या विभागात भारताच्या शशीकिरणने 53 व्या चालीत रशियाच्या फेडोसिव्हचा 53 व्या चालीत पराभव केला. शशीकिरणने साडेतीन गुण मिळविले आहेत. या विभागात पाचव्या फेरीअखेर ऍलेक्सी शिरोव्ह, निजेर तसेच फिरोजा, सेरिक आणि अर्मेनियाचा रॉबर्ट हे प्रत्येकी समान चार गुणांसह संयुक्त आघाडीवर आहेत.









