स्वतःच्या मुलाची सुरक्षा आणि त्याला जीवनातील प्रत्येक सुख देण्यासाठी एक आई स्वतःचा जीव देखील पणाला लावू शकते. निकी एंट्रम अशीच एक ऑस्ट्रेलियन आई आहे. तिने स्वतःच्या मुलाच्या आनंदाच्या आड जन्मजात दिव्यांगत्वही येऊ दिले नाही. 43 वर्षीय निकी यांनी स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक स्वरुपाने दिव्यांग मुलाला पाठीवर घेत निम्मे जग दाखविले आहे.

निकी एंट्रम यांनी स्वतःचा मुलगा जिमी याला स्वतःच्या वयाच्या 17 व्या वर्षी जन्म दिला होता. जिमी हा जन्मजात दिव्यांग होता. त्याला शारीरिक तसेच मानसिक दिव्यांगत्वासह अंधत्वाचीही समस्या होती. अशा स्थितीत त्याला 24 तास देखभालीची गरज होती.
निकी एंट्रम यांनी मुलाच्या कुठल्याही समस्येला त्याच्या आनंदाच्या आड येऊ दिलेले नाही. आता 26 वर्षांचा झालेल्या जिमीला निकी यांनी स्वतःच्या पाठीवर उचलून घेत हवाईपासून बाली आणि पॅरिस दाखविले आहे. क्वीन्सलँडच्या सनसाइन कोस्टमध्ये राहणाऱया निकी यांनी स्वतःच्या मुलाला सर्वात चांगले जीवन देण्याचा शब्द दिला होता आणि तो पूर्ण करण्यासाठी त्या अक्षरशः झटत आहेत. कोरोना संकट वाढण्यापूर्वी त्यांना आता कॅनडाची ट्रिप पूर्ण करायची आहे.
निकीकडे व्हिलचेअर असले तरीही त्याची आई त्याला खांद्यांवर घेत सैर घडवून आणू इच्छिते. काही अंतर जिमीला कापण्यास त्या सांगतात. तर अवघड मार्गांवर त्याला त्या उचलून घेतात.
प्रवासावर जाताना अनेक डायपर, कपडे अणि बेड पॅड्स, शीट्ससह पिलोकेस घेऊन जातो असे त्या सांगतात. निकी यांच्या प्रवासयोजनेत रेस्टॉरंट, हॉटेल आणि ऍडव्हेंचरस ट्रिप्स देखील असतात. अनेकदा त्यांना नकार दिला जातो, निकी यांनी स्वतःच्या बॅग्ससह जिमीला पाठीवर उचलून घेण्याचा सराव केला आहे.
जीवनातील अत्यंत छोटी आणि मोठय़ातील मोठी गोष्ट मुलासमवेत आनंदाने अनुभवू इच्छिते असे त्यांचे म्हणणे आहे. आउटिंगला निघण्यापूर्वी जिमीला कपडे घालून तयरा करते आणि त्याच्या गरजेच्या वस्तू सोबत घेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.









