अर्ज करण्यासाठी अंध-दिव्यांग व्यक्तींची गर्दी : बसपास नूतनीकरणाची मुदत फेब्रुवारीपर्यंत
प्रतिनिधी / बेळगाव
अंध, दिव्यांगांच्या बसपासची मुदत संपलेल्या बसपासच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज दाखल करण्यासाठी परिवहन मंडळाच्या विभागीय संचार कार्यालयाच्या बसपास विभागात अंध व दिव्यांग व्यक्तींची वर्दळ वाढली आहे. यंदा बसपास प्रक्रियेत बदल झाला असून बसपास मिळवायचा असल्यास सेवा सिंधू संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
दिव्यांग क्यक्तींचा प्रवास सुखकर व्हावा, त्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी परिवहनकडून वर्षभरासाठी सवलतीच्या दरात बसपास उपलब्ध करून दिला जातो. मात्र, सर्वच बसपासची प्रक्रिया यावषी पूर्णपणे बदलण्यात आली असून संबंधितांना आता बसपाससाठी ऑनलाईन कर्ज करावा लागणार आहे. अर्ज दाखल केलेली पावती बसपास विभागात द्यावी लागणार आहे. रितसर कागदपत्रांची छाननी करून पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे. संबंधित दिव्यांग व अंध व्यक्तींना वर्षभरासाठी 660 रुपयांत बसपास उपलब्ध होणार आहे.
राज्य परिवहन मंडळातर्फे दिव्यांगांना वर्षभरासाठी सवलतीच्या दरात देण्यात येणाऱया बसपास नूतनीकरणाची मुदत फेब्रुवारीपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे संबंधित दिव्यांग व अंध व्यक्तींना जुना बसपास दाखवून प्रवास करता येणार आहे. 40 टक्के व जास्त अपंग क्यक्तींना सवलतीच्या दरात बसपास उपलब्ध करून दिला जाणार आहे. या शिवाय अंध, दिव्यांग व्यक्तींना नवीन बसपासची प्रक्रिया सुरू झाली असून नवीन बसपाससाठीही दिव्यांग नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. बेळगाव आगारासह चिकोडी, रायबाग, संकेश्वर, गोकाक आगारातून दिव्यांगांच्या बसपासची प्रक्रिया सुरू झाली आहे.
बसपास मिळविण्यासाठी अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, दोन छायाचित्रे, युडीआयडी कार्ड प्रत, सेवा सिंधू पोर्टलमधून मिळविलेली अर्जाची प्रत आदी कागदपत्रांसह 660 रु. शुल्क दिक्यांग बसपास विभागात जमा करणे बंधनकारक आहे.









