प्रतिनिधी / बेळगाव
लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी आणि सामाजिक अंतर राखण्याबाबतच्या अडचणी लक्षात घेऊन सरकारने दिव्यांग आणि ज्येष्ट नागरिकांसाठी त्यांच्या घराजवळ किंवा त्यांना सोयीचे ठरेल, अशा ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्याची सूचना केली आहे. यासंदर्भात नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन ऍडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड-19 या समितीने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला सदर शिफारस केली होती.
लसीकरण केंद्रांवर लोकांच्या रांगा लागत आहेत. मात्र तेथे बसण्याची कोणतीच सोय नाही किंवा ती पुरेशी नाही. त्यामुळे दिव्यांग व ज्ये÷ नागरिकांना रांगेत उभे रहावे लागते. शारीरिक क्षमतेचा विचार केल्यास उभे राहणे त्यांना कठीण जाते. त्यामुळे दिव्यांग-ज्येष्ट नागरिकांसाठी त्यांना सोयीचे ठरेल अशा ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्याचा आदेश आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना दिला आहे.
या निर्णयामुळे दिव्यांग आणि ज्येष्ट नागरिकांची सोय होणार आहे. मात्र या दोन घटकांव्यतिरिक्त तेथे अन्य कोणालाही लस दिली जाणार नाही, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.









