प्रतिनिधी / सातारा :
सातारा जिल्ह्यातील खासदार, आमदार यांनी त्यांचा दिव्यांग निधीचा फंड खर्च केलेला नाही. तो खर्च करण्यात यावा, दिव्यांगांना त्यांच्या हक्काचा निधी देण्यात यावा, या मागणीसाठी प्रहार अपंग क्रांती साताऱ्याच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयकुमार गोरे यांची भेट घेवून विनंती केली. तसेच जिल्ह्यातील इतर आमदारांची भेट घेवून त्यांना दिव्यांगाचा 5 टक्के निधी खर्च करण्याबाबत विनंती करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रहार अपंग क्रांतीचे अजय पवार यांनी दिली. यावेळी प्रहार अपंग क्रांती सातारा जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत बगले, प्रहार अपंग क्रांती माण तालुका अध्यक्ष नागेश खांडेकर उपस्थित होते.