उचगांव / वार्ताहर
दिवाळीच्या सणाला खरेदीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेल्या करवीर तालुक्यातील गांधीनगर बाजारपेठेमध्ये ग्राहक वर्गाची मोठी गर्दी होत आहे. वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक सुरळीत करुन वाहतूक कोंडी फोडावी या मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेच्यावतीने गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांना देण्यात आले.
यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले चारचाकी पार्किंग व्यवस्था कोणत्याही एका बाजूला न करता गांधीनगर रेल्वेस्टेशन परिसर व गांधीनगर हायस्कूलच्या विशाल प्रांगणात तसेच वीटभट्टी परिसरात करण्यात यावे. त्यामुळे नेहमी होणारी वाहतुकीची कोंडी कमी होईल तसेच अवजड वाहने दिवाळीच्या सणामध्ये मुख्य रस्त्यावरून प्रवेश देऊ नये दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्याची अत्यंत गरज आहे.
त्रास सहन करावा लागत आहे. दीर्घकाळ लॉकडाउननंतर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेली गांधीनगर आता कूठे गजबजू लागली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने वरील उपाय योजना करून वाहतूक कशी सुरळीत होईल याकडे आपण गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी गांधीनगर मधील वाहतुकीच्या सर्व समस्या सोडवून योग्य ते नियोजन करू असे आश्वासन दिले. याप्रसंगी करवीर तालुका प्रमुख राजू यादव,कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर आदी उपस्थित होते.
Previous Articleरत्नागिरी जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल
Next Article खेड पोलिसांकडून ५० जणांवर दंडात्मक कारवाईचा बडगा









