कोल्हापूर / प्रतिनिधी
नोंदणीकृत बांधकाम कामगारांना पाच हजार रूपये दिवाळी बोनस द्या, बांधकाम कामगार व घरेलु मोलकरीण यांच्या मुलीच्या लग्नासाठी 50 हजार रूपये मदत द्या, बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजना लागू करा, यासह अन्य मागण्यांसाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या घरासमोर खर्डा-भाकरी खाऊन आंदोलन करण्यात आले. पालकमंत्र्यांचे सहकारी श्रीराम सोसायटीचे सभापती हरी पाटील यांनी निवेदन स्वीकारले.
निवेदनातील मागण्या अशा : महाराष्ट्र शासनाकडून बांधकाम कामगारांबाबतीत बरेच निर्णय शासन दरबारी प्रलंबित आहेत. समाज कल्याण विभाग कोल्हापूर येथील तीन वर्षापासून तादुरूस्त असलेल्या विपश्यन केंद्राचे (सभागृह) त्वरीत दुरूस्ती करावी. कोल्हापूर सहाय्यक आयुक्त संदेश आयरे यांच्या बदलीचे आदेश रद्द करा. आंदोलनात अध्यक्ष संजय गुदगे, प्रशांत वाघमारे, समाधान बनसोडे, फरजाना नदाफ, भारत कोकाटे, राणी गायकवाड, संभाजी कागलकर, प्रितम कांबळे आदींचा सहभाग होता.