सावंतवाडी/प्रतिनिधी-
सह्याद्री पट्ट्यातील चौकुळ, कुंभवडे, खडपडे या भागातील रस्त्यावर दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर होताना दिसतोय. या मार्गावरून कुंभवडे येथे जात असताना माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते विजय गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांना या बिबट्या वाघाचे दर्शन झाले. त्यांनी आपल्या कॅमेरात या वाघाची सफर टिपली आहे. तळकट, कुंभवडे परिसरात गेले काही दिवस हा वाघ वास्तव्यास आहे. या वाघाच्या दर्शनाने भागात येणार्या जाणार्यांना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे









