बेंगळूर : राज्यात पुन्हा कोरोनाचा फैलाव वाढला असून खबरदारी उपाययोजना हाती घेण्यात येत आहे. दरम्यान राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले असून मंगळवारी दिवसभरात 1,135 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. 25 दिवसांपूर्वी दिवसभरातील रुग्णांची संख्या 350 आसपास होती. आता ती हजार पार झाली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार मागील 24 तासांत 516 जण कोरोनामुक्त झाले. तर दिवसभरात 6 बाधितांचा मृत्यू झाला. सध्या उपचारातील रुग्णसंख्या 9428 इतकी आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 9,62,339 इतक्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 9,40,489 जण संसर्गमुक्त झाले आहेत. तर एकूण 12,403 जण कोरोनाने दगावले आहेत. मागील 24 तासांत 68,469 कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर दिवसभरातील रुग्ण आढळण्याचे प्रमाण 1.65 टक्के इतके होते.
Previous Articleबेंगळूर-जपान थेट विमानसेवा सुरू
Next Article रागिणी, संजनासह 25 जणांविरुद्ध चार्जशिट
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









