बंगळूर/ प्रतिनिधी
बंगळुरुच्या कांतीरवा स्टुडिओत असलेल्या दिवंगत अभिनेते आणि राजकारणी अंबरीश यांच्या स्मारकासाठी कर्नाटक सरकारने सोमवारी ५ कोटी देण्याची घोषणा केली. कांतीरावा स्टुडिओच्या १.३४ एकर जागेवर सदरचे स्मारक उभारण्यात येणार आहे. दिवंगत अभिनेत्याची पत्नी, मंड्या मतदार संघातील खासदार सुमलथा यांनी सरकारद्वारे गठीत केलेल्या उच्च-स्तरीय समितीच्या सदस्यांसह मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची भेट घेतली. या बैठकीत येडियुरप्पा यांनी अधिकाऱ्यांना सदर स्मारकाचे काम वेगवान पूर्ण करण्याचे निर्देश दिले. विधान सौध येथील बैठकीला निर्माते वेंकटेश, अभिनेते अभिषेक अंबरीश उपस्थित आदी उपस्थित होते.









