ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीतून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. दिल्लीत कोरोना व्हायरसच्या आकड्यात कमालीची घट झाली आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे केवळ 954 रुग्ण आढळले आहेत. तर 35 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 23 हजार 747 वर पोहोचली आहे.
सोमवारी 1784 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 1,04,918 जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर मृतांचा एकूण आकडा 3663 इतका आहे. त्याबरोबरच सध्या दिल्लीत 15 हजार 166 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दिल्लीत सोमवारी 4177 आरटी – पीसीआर तपासण्या आणि 7293 रैपिड एंटिजेन तपासण्या करण्यात आल्या. तर राज्यात आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या एकूण 8 लाख 30 हजार 459 तपासण्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे 27 मे नंतर दिल्लीत पहिल्यांदाच मागील 24 तासात 1 हजार पेक्षा कमी रुग्णांची वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत सध्या 8379 रुग्ण होम क्वारंटाइन आहेत तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.78 टक्के आहे तर मृत्युदर 2.96 टक्के इतका आहे.









