ऑनलाईन टीम/तरुण भारत
दिल्ली एनसीआरमधील वायू प्रदुषणावर बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा सुनावणी सुरू केली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सरकारने प्रदूषण कमी करण्यासाठी काय काम केले, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला आहे.
सुनावणीवेळी सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा म्हणाले की, ‘समस्या ही आहे की न्यायालय काम करत आहे आणि सरकार काहीच काम करत नाही, अशी भावना नागरिकांची आहे. दरम्यान, काही वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या माहितीनुसार, प्रदुषण कमी करण्याबाबत न्यायालयाने उचललेल्या पावलांमुळे 40 टक्क्यांनी प्रदुषण कमी झाल्याचे म्हंटले आहे. मात्र, हे कितपत अचूक आहे हे माहीत नाही, असे म्हंटले.