ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत ठाण मांडून बसलेल्या आंदोलक शेतकऱ्यांनी आज भारत बंदची हाक दिली होती. आंदोलक शेतकरी आणि सरकार यांच्यातील चर्चेच्या पाच फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. शेतकरी मात्र तिन्ही कृषी सुधारणा कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शेतकरी सायंकाळी 7 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत.
इंडियन फार्मर्स युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले, आज सायंकाळी सात वाजता आम्ही गृहमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहोत. सिंघू सीमेवर जाऊन तिथून आम्ही गृहमंत्र्यांकडे जाऊ. शाह शेतकऱ्यांच्या 13 सदस्यांच्या टीमची भेट घेणार आहेत.









