ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत तर चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. मागील चोवीस तासात दिल्लीत आता पर्यंतचे सर्वात जास्त रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या 15 हजार पेक्षा अधिक झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत एका दिवसात म्हणजेच आज सकाळी 9 पर्यंतच्या आकडेवारीनुसार 792 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे दिल्लीतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 15 हजार 257 वर पोहचली आहे. दिल्लीत पहिल्यांदाच एका दिवसात 700 च्या वर रुग्ण आढळले आहेत.
तर कालच्या एका दिवसात कोरोनामुळे 15 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता पर्यंत 303 लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. तर कालच्या दिवसात 310 लोकाची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान, दिल्लीत सध्या 7690 रुग्ण ॲक्टिव आहेत.
यामध्ये 19 मे रोजी 500 रुग्ण, 20 मे ला 534, 21 मे ला 571 तर 22 मे रोजी 660 तर 23 मे रोजी 591, 24 मे रोजी 508, 25 मे रोजी 635, 26 मे रोजी 412 आणि 27 मे रोजी 792 नवे रुग्ण आढळले आहेत.









