ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. देशाची राजधानी
असलेल्या दिल्लीत तर चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. मागील चोवीस तासात दिल्लीत 591 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे दिल्लीतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 12 हजार 910 वर पोहचली आहे. लागोपाठ चौथ्या दिवशी दिल्लीत 500 पेक्षा अधिक नवे रुग्ण आढळले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आता पर्यंत 200 पेक्षा अधिक लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. दिल्लीत सध्याच्या घडीला 6414 ॲक्टिव केस आहेत. तर मागील चार दिवसात 2100 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.
यामध्ये 19 मे रोजी 500 रुग्ण, 20 मे ला 534, 21 मे ला 571 तर 22 मे रोजी 660 तर 23 मे रोजी 591 नवे रुग्ण आढळले आहेत.
दिल्ली सरकारने आता पर्यंत 10 लाखमधील 7000 पेक्षा अधिक लोकांची तपासणी केली असून दिल्लीत सध्या कोरोना संक्रमणाचा दर 5 टक्के आहे. तर मृत्युदर 1.59 टक्क्यांवर पोहोचला आहे.









