ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सर्वच राज्यात रुग्ण वाढ उच्चांक गाठत आहे. त्यातच आता भाजपचे खासदार मनोज तिवारी यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, मागील दोन दिवसांपासून सर्दी आणि थोडा ताप जाणवत होता त्यामुळे गुरुवारी मी माझी कोरोना चाचणी केली असता त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सद्य स्थितीत मी घरातच विलगिकरणात असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझ्यावर उपचार सुरु आहेत. मागील दोन तीन दिवसात जे कोणी माझ्या संपर्कात आले होते त्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.









