ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना व्हायरसच्या संकटाशी लढणा-या दिल्लीवासियांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. कोरोनाची लागण झालेल्या पिझ्झा डिलीव्हरी बॉयच्या संपर्कात आलेल्या 16 लोकांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या दक्षिण भागातील एका पिझ्झा डिलिव्हरी बॉयला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर तब्बल 72 लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. कारण या सर्वांना कोरोना झालेल्या डिलीव्हरी बॉयने पिझ्झा डिलीव्हर केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, क्वारनटाईन केलेल्या ज्या लोकांमध्ये कोरोनाची लक्षण दिसत होती, त्यांना चाचणीसाठी आर एम एल रूग्णालयात नेण्यात आले त्यातील 16 रूग्णांची टेस्ट आज निगेटिव्ह आली आहे.
सध्या दिल्लीमध्ये कोरोना बाधितांची संख्या 2 हजारांच्या वर पोहोचली असून 45 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर 72 लोकांची प्रकृती स्थिर आहे.









