ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीमध्ये कोविशिल्ड लसींचा साठा संपला असल्याने राज्यातील काही लसीकरण केंद्रे आज पासून बंद केली जाणार आहेत, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीत सोमवारी कोविशिल्डच्या 19,000 लस तर कोवॅक्सिनच्या 2,39,000 लस उपलब्ध होत्या.
दिल्लीत सतत लसीकरणाचा तुटवडा जाणवत आहे. 12 जुलैच्या सकाळपर्यंत कोविशिल्डचे केवळ 19 हजार डोस उपलब्ध होते. त्यामुळे अनेक केंद्रांवर लसींची कमी निर्माण झाल्याने नागरिकांना लस न घेताच परत परतावे लागले.
दरम्यान, दिल्ली सरकारने केंद्र सरकारकडे पर्याप्त लस पुरवठा केला जावा अशी मागणी केली आहे. दिल्लीत आतापर्यंत जवळपास 90 लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. यातील 68 लाख 26 हजार नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे, 21 लाख जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.









