ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली. सध्या त्यांच्या मध्ये कोरोनाची हलकी लक्षणे आढळून आल्याने त्यांनी स्वतः ला घरामध्ये आयसोलेट करुन घेतले आहे.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, माझे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या माझ्यामध्ये हलकी लक्षणे दिसून आली आहेत. त्यानंतर मी सध्या विलगीकरणात आहे. मागील काही दिवसात जे कोणी माझ्या संपर्कात आले होते त्यांच्या टेस्ट करून झाल्या आहेत. तरी सर्वांनी काळजी घ्यावी. मी दिल्लीतील एकूणच परिस्थिती आणि सर्व काम घरातूनच हॅण्डल करेन, असेही त्यांनी यावेळी सांगितले.









