नवी दिल्ली
दिल्लीत प्रदूषण पातळी कमी करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. अशा स्थितीत सरकारने एक लाख वाहनचालकांना झटका दिला आहे. सरकारने 10 वर्षे जुन्या एक लाख वाहनांची नेंदणी संपुष्टात आणली आहे. या निर्णयानंतर संबंधित वाहने रस्त्यांवर उतरविल्यास वाहनचालकांच्या अडचणी वाढणार आहे. रस्त्यांवर पकडण्यात आल्यास थेट वाहन जप्त करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
सरकारने 10 वर्षे जुन्या वाहनांना रस्त्यांवर हटविण्यासाठी कठोर निर्णय घेतला आहे. यामुळे आता या वाहनांची नोंदणी अन्यत्र करविली नसल्यास किंवा पर्यायी व्यवस्था केली नसल्यास चालकांच्या अडचणी वाढणार आहेत. आता कुठल्याही प्रकारे या वाहनांकरता दिलासा मिळणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. या वाहनांचे क्रमांक सरकारच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.









