- कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 13,09,578 वर !
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत उल्लेखनीय कमी दिसून येत आहे. राज्यात काल 6,456 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 262 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे दिल्लीतील कोरोना संक्रमणाचा दर 10.40% इतका झाला आहे. काही दिवसांपूर्वी हा दर 35 टक्क्यांपर्यंत पोहचला होता. त्यात मोठ्या प्रमाणात कमी दिसून आली आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या 13 लाख 93 हजार 867 वर पोहोचली आहे.

- लॉकडाऊनचा अवधी एक आठवडा वाढवला
त्यातच काल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, रुग्ण संख्या कमी होत असली तरी दिल्लीत एक आठवडा लॉकडाऊन वाढवत असल्याची घोषणा केली. त्यामुळे आता राजधानी दिल्लीत 24 मे च्या सकाळी 5 वाजेपर्यंत लॉक डाऊन कायम असणार आहे. या काळातही दिल्लीतील मेट्रो बंद असणार आहे.
केजरीवाल यांनी सांगितले की, दिल्लीत लॉकडाऊनचा चांगला परिणाम दिसून येत आहे. 26 एप्रिलनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. पुढे ते म्हणाले, लॉकडाऊनचा उपयोग हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आणि संसाधन अधिक मजबूत करण्यासाठी केला जाणार आहे. आम्हाला आशा आहे की पुढील आठवड्यात अधिक रिकव्हरी होईल.
केजरीवाल यांनी लसीची कमतरता लक्षात घेऊन केंद्र आणि कंपन्यांना पत्र लिहिले आहे. ही परिस्थिती लवकर सुधारेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, दिल्लीत या लॉकडाऊनमध्ये देखील सर्वाजिक ठिकाणी तथा कार्यालयामध्ये लग्न समारंभ आयोजित करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. केवळ 20 लोकांच्या उपस्थितीत घरच्या घरी लग्न कार्यास परवागी दिली आहे. दरम्यान, या काळात आवश्यक सेवांमध्ये कार्यरत असलेल्या नागरिकांना बाहेर पडण्यास परवानगी देण्यात आली आहे.









