- टेस्टिंगमध्ये आली कमालीची घट
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत मागील 24 तासात नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची कमी दिसून आली आहे. सोमवारी मिळालेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात 4,525 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. याचे कारण टेस्टिंगमध्ये आलेली घट देखील असू शकते. दिल्लीत यावेळी 55 हजार पेक्षा कमी टेस्ट करण्यात आल्या आहेत. या सगळ्यात सर्वात चिंताजनक गोष्ट म्हणजे मोठ्या संख्येने होणारी मृत्यू संख्या होय. मागील 24 तासात तब्बल 340 जणांनी आपला जीव गमावला आहे.

दिल्लीत काल 53,756 टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये 41,849 आरपीटीसीआर आणि 11,907 एंटीजन टेस्ट करण्यात आल्या. कमी टेस्ट आणि कमी रुग्ण संख्येमुळे संसर्गाच्या दरात कमी आली असून सद्य स्थितीत 8.42 % इतका झाला आहे. यासोबतच काल 10,918 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. एके काळी दिल्लीत एक लाख पेक्षा अधिक टेस्ट आणि संसर्ग दर 35 % इतका होता.
दरम्यान, राजधानी दिल्लीत आतापर्यंत 13 लाख 98 हजार 391 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील 13,20,496 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 21, 846 जणांनी आपला जीव गमावला आहे. सद्य परिस्थितीत 56,049 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर राजधानीत 57,484 झोन आणि 697 कंट्रोल रूम आहेत.









