ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत मागील 24 तासात 3,009 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 252 जणांचा मृत्यू झाला आहे. कालच्या दिवसात तब्बल 7,288 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
- आतापर्यंत करण्यात आलेल्या टेस्ट
मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 85 लाख 95 हजार 993 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 45,685 आरटीपीसीआर टेस्ट आणि 17,505 रैपिड एंटिजेन टेस्ट एका दिवसात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील संसर्गाच्या दरात घट झाली असून 4.76 % इतका झाला आहे. तर 46 दिवसानंतर संसर्गाचा दर 5 टक्क्यांपेक्षा कमी आला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.62 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 50,074 झोन आहेत. तर 406 कंट्रोल रूम आहेत.
- बाधितांनी ओलांडला 14.12 लाखांचा टप्पा
दिल्लीतील रुग्णालयातील एकूण 25 हजार 068 बेड पैकी 11,388 बेड भरलेले असून 13,680 बेड रिकामे आहेत. दिल्लीत बाधितांनी 14.12 लाखांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 14 लाख 12 हजार 959 वर पोहचली असून त्यातील 13 लाख 54 हजार 445 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 22,831 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत 35 हजार 683 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
- लसीकरणाचा डाटा
दिल्लीत मागील 24 तासात 77 हजार 594 लोकांना लस देण्यात आली. यामध्ये 56,375 जणांना पहिला डोस 21,219 जणांना दुसरा डोस देण्यात आला. तर राजधानी दिल्लीत आतापर्यंत एकूण 49 लाख 67 हजार 622 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये 38 लाखांंपेक्षा अधिक जणांना पहिला डोस तर 11 लाख पेक्षा अधिक जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.