- सक्रिय रुग्णांनी ओलांडला 92 हजारांचा टप्पा
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत कोरोना रोज नवे नवे उच्चांक गाठत आहेत. परिस्थिती अधिक भयंकर होत चालली आहे. कोरोना रुग्णांनी 9.80 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यातच शुक्रवारी 24 हजार 331 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 348 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे दिल्लीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 9 लाख 80 हजार 679 वर पोहोचली आहे. तर संक्रमणाचा दर वाढून 32.48 % इतका झाला आहे.

त्यातच मागील 24 तासात 23,572 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 08 लाख 75 हजार 109 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 13,541 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत 92 हजार 029 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 66 लाख 31 हजार 245 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 43,711 आरटीपीसीआर टेस्ट आणि 31,326 रैपिड एंटिजेन टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत दिल्लीत 23,561 झोन आणि 1228 कंट्रोल रूम आहे.









