ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. शुक्रवारी दिवसभरात नव्या रुग्णांच्या संख्येपेक्षा दुप्पटीपेक्षा अधिक रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. ताज्या आकडेवारीनुसार मागील 24 तासात केवळ 213 नवे रुग्ण आढळून आले असून 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 497 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

- मृतांची संख्या 24,800 वर
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 14 लाख 30 हजार 884 वर पोहोचली आहे. त्यातील 14 लाख 02 हजार 474 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. तर 24,800 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून राजधानीत रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. सद्य स्थितीत संसर्ग दर 0.30 % इतका आहे.
- 3,610 रुग्णांवर उपचार सुरू
सद्य स्थितीत 3 हजार 610 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील 2,071 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. कोविड केअर केंद्रात 108 जण आहेत. तर 1123 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. दिल्लीत आतापर्यंत जवळपास 2 कोटी 01 लाख 90 हजार 830 टेस्ट करण्यात आल्या आहेत. यातील 50,766 आरटीपीसीआर टेस्ट आणि 20,747 रैपिड एंटिजेन टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत दिल्लीत 7,062 झोन आहेत.
- मागील 24 तासात 78,936 जणांचे लसीकरण
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत मागील 24 तासात 78,936 लोकांना लस देण्यात आली. यामध्ये 61,042 जणांना पहिला डोस तर 17,894 जणांना दुसरा डोस देण्यात आला. तर राजधानी दिल्लीत आतापर्यंत एकूण 59 लाख 89 हजार 286 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यातील 45,77, 250 जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर 14,12,036 नागरिकांना दुसरा डोस घेतला आहे.









