ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत मागील 24 तासात कोरोना रुग्णांच्या संख्येत उल्लेखनीय कमी दिसून आली आहे. राज्यात काल 10, 489 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 308 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे दिल्लीतील कोरोना संक्रमणाचा दर 14.24 % इतका झाला आहे. काही दिवसांपूर्वी हा दर 35 टक्क्यांपर्यंत पोहचला होता. त्यात मोठ्या प्रमाणात कमी दिसून आली आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या 13,72,475 वर पोहोचली आहे.
त्यातच मागील 24 तासात 15,189 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 12 लाख 74 हजार 140 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 20,618 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत 77 हजार 717 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 81 लाख 01 हजार 281 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 58,709 आरटीपीसीआर टेस्ट आणि 14,966 रैपिड एंटिजेन टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत दिल्लीत 57,550 झोन आणि 693 कंट्रोल रूम आहे.