ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत सुरू असलेल्या सीसीए आणि एनआरसी विरोधातील आंदोलनाने अधिकच हिंसक वळण घेतले आहे. दिल्लीतील मौजपूर व गोकुलपुरी भागात आज तिसऱया दिवशीही दगडफेक व निदर्शने सुरु आहेत. आज सकाळी काही भागात दगडफेक सुरु झाली. रविवारपासून सुरु झालेल्या हिंसाचारात एका पोलीस कर्मचाऱयांसह सात जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, खबरदारी म्हणून झफराबाद, मौजपूर-बबरपूर, गोकुळपुरी, जोहरी एन्क्लेव्ह आणि शिव विहार अशी पाच मेट्रो स्थानके बंद करण्यात आली आहेत. तसेच मौजपुरात दोन्ही बाजूंकडून दगडफेक सुरू आहे. एक बाजू सतत गोळीबार करीत आहे. मौजपुरात लोक छप्परांवरुन गोळीबार करीत आहेत.
हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी उत्तर पूर्व दिल्लीमध्ये निमलष्करी दलाच्या 35 कंपन्या आणि विशेष सेल, गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखेत अधिकारी तैनात केले आहेत. दिल्लीच्या विविध जिह्यांमधून स्थानिक पोलिसही पाचारण करण्यात आले आहे
दरम्यान या दगडफेकीत सोमवारी हेड कॉन्स्टेबल रतन लाल हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथं त्यांच्या मृत्यू झाला.