ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पाकिस्तानातून आलेल्या टोळधाडीने आता दिल्लीकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे टोळधाडीचा संभाव्य धोका पाहता दिल्ली सरकारने दक्षिण आणि उत्तर जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जाहीर केला आहे.
दिल्लीत टोळांचा धोका लक्षात घेता दिल्ली सरकारचे विकास मंत्री गोपाळ राय यांनी आपत्कालीन बैठक बोलावली होती. या बैठकीला विकास सचिव, विभागीय आयुक्त, संचालक कृषी, डीएम दक्षिण दिल्ली, डीएम पश्चिम दिल्ली उपस्थित होते.
टोळांचा मोठा समूह हळू हळू पलवलच्या दिशेने वाटचाल करीत आहे, परंतु एक छोटा तुकडा जसोला आणि भाटीकडे सरकला आहे. येथे वनविभागाचे संपूर्ण क्षेत्र आहे. त्यामुळे या भागात ड्रम आणि डीजे वाजविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच फटाके लावून कडूनिंबाची पाने पेटवण्याचाही सल्ला यावेळी देण्यात आला.ठिकठिकाणी औषष फवारणी करुन टोळधाडीचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.









