ऑनलाईन टीम/दिल्ली
राजधानी दिल्लीत पोलिसांनी घातपाताचा मोठा कट उधळून लावला. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं शुक्रवारी मध्यरात्री अतिरेक्यांचा हा कट उधळून लावला. यावेळी रिंग रोड परिसरातील धोला कुवा येथून पोलिसांनी ISI च्या अतिरेक्याला अटक केली. अबू युसूफ असं या अतिरक्याच नाव असून, आयएसआय या दहशतवादी संघटनेसाठी तो काम करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
अटक करण्यापूर्वी पोलीस आणि अतिरेक्यामध्ये चकमक उडाली. पोलिसांनी धडक कारवाई करत अतिरेक्याला बेड्या ठोकल्या. त्याच्याजवळून आयईडी स्फोटकांसह मोठा शस्त्रसाठा जप्त केला. तर, घटनास्थळावरून एक अतिरेकी फरार झाला आहे.
“धोला कुवा येथून एका आयएसआयच्या अतिरेक्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस आणि अतिरेक्यामध्ये गोळीबार झाल्यानंतर ही त्याला अटक करण्यात आलं. त्याच्याजवळ आयईडी बॉम्बसह शस्त्रसाठा आढळून आला असून, जप्त करण्यात आला आहे,” अशी माहिती दिल्लीचे पोलीस उपायुक्त प्रमोद सिंह यांनी याविषयी माहिती दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









