ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत मागील 24 तासात 158 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर एका रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 37 हजार 603 वर पोहचली आहे. यामधील 1,053 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 157 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 6 लाख 25 हजार 653 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 10,897 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील 10 दिवसांमध्ये 11 जणांनी आपला जीव गमावला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 18 लाख 46 हजार 064 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 39,931 आरटीपीसीआर टेस्ट आणि 20,905 रैपिड एंटिजेन टेस्ट एका दिवसात करण्यात आल्या आहेत.
सद्य स्थितीत कोरोना संसर्गाचे प्रमाण 5.38 % आणि मृत्यू दराचे प्रमाण 1.71%आहे. तर 649 झोन आणि 126 कंट्रोल रूम आहेत.