ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत जर कोणाचा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीच्या परिवारास 5 लाख रुपयांची मदत केली जाणार असल्याची घोषणा दिल्ली सरकारकडून करण्यात आली आहे. आज दुपारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी याबाबत माहिती दिली.

ते म्हणाले, दिल्ली सरकारने निर्णय घेतला आहे की, जर कोणाचा ऑक्सिजनच्या कमी मुळे मृत्यू झाल्यास परिवाराला 5 लाख रुपये भरपाई दिली जाणार आहे. पुढे ते म्हणाले, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणाचा मृत्यू झाला आहे हे समजावे यासाठी एक हेल्थ एक्स्पर्ट कमिटी तयार करण्यात आली आहे. मात्र केंद्र सरकारने ही कमिटी रद्द केली आहे. पण मग ही कमिटी न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर पुन्हा सुरू झाली.

याबाबत बोलताना सिसोदिया यांनी केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त करताना सांगितले की, मला हेच कळत नाही आहे की, जेव्हा पण कधी दिल्ली सरकार काही चांगल्या गोष्टी करायला जाते त्यावेळी केंद्र सरकार त्यामध्ये अडथळे आणते आहे.









