ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात ऑक्सिजनअभावी 25 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच दिल्लीच्या जयपूर गोल्डन रुग्णालयातही ऑक्सिजनअभावी 20 रुग्णांचा मृत्यू झाला. शुक्रवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेला रुग्णालयाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी याला दुजोरा दिला आहे.
रुग्णालयाशी संबंधित डी.के. बाळूजा म्हणाले, आता आमच्या रुग्णालयात फक्त अर्धा तास पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक आहे. रुग्णालयात कोरोनाचे 215 रुग्ण दाखल आहेत, त्यापैकी बरेच रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांचा जीव धोक्यात आहे.
दरम्यान, दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात ऑक्सिजनअभावी 25, जयपूर गोल्डन रुग्णालयात 20 तर सिग्नस रामा विहारमध्ये 2 रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला आहे.