ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दक्षिण दिल्लीतील जहाँगीरपुरी परिसरात एकाच कुटुंबातील 26 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
केजरीवाल म्हणाले, कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने दिल्लीत 76 कंटेनमेंट झोन निश्चित करण्यात आले आहेत. दक्षिण दिल्लीतील सी ब्लॉकमध्ये असलेल्या जहाँगीरपुरीतही कंटेनमेंट झोन तयार करण्यात आला आहे. मात्र, तरी देखील लोक घराबाहेर पडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत आहेत.
या परिसरातील 60 संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 31जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामधील 26 जण एकाच कुटुंबातील असल्याचे पाहून आरोग्य विभागालाही धक्का बसला. एकाच कुटुंबातील हे 26 जण जहाँगीरपुरी परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आल्यानंतरही हे लोक एकमेकांच्या घरी गेल्याने त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.









