- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केजरीवाल सरकारने सोमवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार दिल्लीत आज रात्रीपासून 10 वाजल्यापासून पुढच्या सोमवार पहाटे 5 वाजेपर्यंत म्हणजेच 26 एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
अरविंद केजरीवाल म्हणाले, दिल्लीत कोरोनाची चौथी लाट आली आहे. तसेच आरोग्य यंत्रणा देखील मोठ्या प्रमाणात तणावात आहे. दिल्लीत रोज 1 लाख चाचण्या होत आहे. आम्ही मृत्यूचे आकडेही लपवले नाहीत. आम्ही आत्तापर्यंत कधीही खोटे बोललो नाही. जी परिस्थिती आहे ती नेहमीच जनतेसमोर ठेवली आहे . दरम्यान, या 6 दिवसात बेड वाढवण्यावर भर दिला जाणार आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
पुढे ते म्हणाले, या 6 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये मॉल, स्पा, जिम, सभागृह पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहेत. तर थिएटर 30% क्षमतेने चालू ठेवली जाणार आहेत. तसेच आवश्यक सेवा, खाद्य पदार्थांची विक्री, मेडिकल दुकाने सुरू असणार आहेत. लग्न समारंभासाठी केवळ 50 लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी असणार आहे. त्यासाठी वेगळे पास दिले जाणार आहेत