प्रतिनिधी / सातारा
दिल्ली येथे सुरु असलेले शेतकऱयांच्या कृषी विध्येयकाच्या विरोधात आंदोलनाला साताऱयातील डाव्या विचारांच्या संघटनांनी पाठींबा देण्यासाठी आंदोलन केले. तसेच काँग्रेसने काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलन करुन पाठींबा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
केंद्र सरकारने बहुमतांच्या जोरावर शेतकऱयांसाठी तीन कायदे केले आहेत. या कायद्याला लोकसभेत विरोध करता न आल्याने पंजाबमधील शेतकऱयांनी या कायद्याच्या विरोधात मोर्चा काढला आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा आठवा दिवस आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी राज्यभर काँग्रेसने प्रत्येक तालुक्यात आंदोलन करुन पाठींबा देण्याचे काँग्रेसचे वरीष्ठ नेत्यांनी इशारा दिला होता. त्यानुसार सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीत फक्त निदर्शने करण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किसान सभा या बॅनरखाली डाव्या विचारांचे अस्लम तडसरकर, सिटू संघटनेचे माणिक अवघडे, अंगणवाडी सेविका संघटनेच्या आनंदी अवघडे, आपचे सागर भोगावकर, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप जगताप, विमा कर्मचारी संघटनेचे वसंतराव निकम यांची उपस्थिती होती.









