प्रतिनीधी / बार्शी
केंद्र सरकारणे शेतकरी विरोधी शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक 2020, शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) किंमत हमी आणि कृषी सेवा करार विधेयक 2020, अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक 2020 हे तिन कायदे संमत केले आहेत याचा विरोध करण्यासाठी व दिल्ली अंदोलनाला पठिंबा देणार्या देशव्यापी बंदला पाठिंबा देण्यासाठी बार्शी मध्ये सर्वपक्षीय धरणे आंदोलन मा. तहसिलदार कचेरीसमोर आज दिनांक 14 डिसेंबर 2020 रोजी श्री. भाउसाहेब आंधळकर व कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. हा मोर्चा शेतकरी, सर्वपक्षीय, कामगार वर्ग, विद्यार्थी कृती समिती यांच्यावतिने काढण्यात आले. यावेळी रावसाहेब दानवेंचा निषेध करण्यात आला त्यासोबतच नांदेड येथील मूकबधिर मुलीवर झालेला बलात्कार व खूणाचा निषेध व्यक्त करून आरोपींना फाशी देण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी कॉम्रेड तानाजी ठोंबरे म्हणाले, दिल्लीमधील लढणारे शेतकरी जिगरबाज आहेत त्यांचा आदर्श घेऊन पुढे लढाई शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत घेऊन जावी लागेल. आता घरामध्ये बसून भागणार नाही शिवराममध्ये जाऊन शिवाजी महाराज भगतसिंग शेतकऱ्यांना समजावून सांगावा लागेल. हे समजून सांगत आहे. भाजपच्या दानवे चा निषेध करावा तेवढा थोडाच आहे.
श्री भाउसाहेब आंधळकर म्हणाले, मोदी अंबानींच्या नातवाला भेटायला जातात शेतकऱ्यांना भेटायला त्यांना वेळ नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती जीवनावश्यक वस्तू यांचा बाजार मांडून ते भांडवलदारांच्या ताब्यात देण्याचा घाट सरकारने घातला आहे. हा कट आम्ही शेतकरी कामगारांच्या लढ्याने उध्वस्त करून टाकू.
या मोर्चात अखिल भारतीय किसान सभा, शिवसेना, काँग्रेस आय, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, वंचित बहूजन आघाडी, अधश्रध्दा निर्मूलन समिती,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आयटक डॉ. जगदाळे मामा हॉस्पीटल श्रमिक संघ, आयटक बांधकाम कामगार संघटना, आॅल इंडिया स्टुडंन्टस फेडरेशन, भारत मुक्ती मोर्चा, उडाण फाउंडेशन, राष्ट्रवादी लिगल सेल, आयटक ग्रामपंचायत कर्मचारी संघटना,आदिवाशी संघटना, राजमाता इंदूताई आंधळकर अन्नछत्रालय, भिम टायगर संघटना, प्रहार संघटना, छावा संघटना सहभागी झाल्या होत्या. यावेळी झालेल्या सभेपूढे अॅड. आरगडे मॅडम, दिपक आंधळकर, कॉ. लक्ष्मण घाडगे, आदी उपस्थित होते.