केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे आश्वासन : वाळपई नवोदय पालक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाकडून भेट
प्रतिनिधी / वाळपई
दिल्ली याठिकाणी पडून राहिलेल्या वाळपई जवाहर नवोदय विद्यालयाच्या मुलांना गोव्यामध्ये आणण्यासाठी दोन दिवसात वेगवेगळय़ा स्तरावर प्रयत्न करण्यात येतील अशा प्रकारचे आश्वासन केंद्रीय आयुष्य मंत्री तथा उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी दिले आहे. जवाहर नवोदय विद्यालयाच्या पालक-शिक्षक संघाच्या पथकाने आज सकाळी त्यांची निवासस्थानी भेट घेऊन या संदर्भाचा मुद्दा हल करण्याची विनंती केली. त्यानंतर झालेल्या बैठकीत श्रीपाद नाईक यांनी या मुलांच्या संदर्भात निर्माण झालेली परिस्थिती यावर आपण विशेष लक्ष देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
याबाबतची माहिती अशी की वाळपई जवाहर नवोदय विद्यालयाचे एकूण पंधरा मुले दिल्ली याठिकाणी जवाहर नवोदय विद्यालयात अडकून राहिलेली आहेत. त्याचप्रमाणे दिल्ली येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे एकूण 19 मुले वाळपई जवाहर नवोदय विद्यालयात अडकलेली आहेत. कोरोना रोगाच्या वाढत्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर लाँकडाऊन करण्यात आल्यानंतर यामुलांची व्यवस्था करण्यासाठी अनेक स्वरूपाच्या अडचणी निर्माण झाल्यानंतर पालकांनी यासंदर्भात यामुलांची व्यवस्था करण्यासंदर्भात वेगवेगळय़ा स्तरावर हालचाली सुरू केल्या आहेत.आज पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेंद्र गावस व इतर पदाधिकाऱयांनी केंद्रीय आयुष्य मंत्री श्रीपाद नाईक यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱयांनी संपूर्ण परिस्थितीची माहिती श्रीपाद नाईक याना दिली. त्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये श्रीपाद नाईक यांनी या मुलांची व्यवस्था करण्यासंदर्भात आपण निश्चित प्रमाणप्रमाणात प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
याविद्यालयाची मुले दिल्ली या ठिकाणी अडकून पडलेली आहेत. तरीसुद्धा विद्यालयाचे प्राचार्य यासंदर्भात पूर्णपणे हलगर्जीपणा करीत असल्याबद्दल त्यांनी तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली. एक महिन्यापासून ही मुले दिल्ली याठिकाणी अडकलेली आहेत. इयत्ता नववीतील मुलांना इतरत्र नेऊन त्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देण्याची प्रक्रिया विद्यालयाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमानुसार करण्यात येत असते. याचाच भाग म्हणून वाळपई येथील मुलांना दिल्ली तर तेथील मुलांना वाळपई याठिकाणी आणून त्यांना शिक्षण देण्यात आले. कोरोना रोगाचा संसर्ग यामुळे निर्माण झालेली गंभीर स्वरूपाची परिस्थिती याच्यापूर्वी विद्यालयाकडून व्यवस्था करण्याचे गरज होती. मात्र वाळपई नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांकडून आवश्यक स्तरावर प्रयत्न करण्यात न आल्यामुळे गेल्या एक महिन्यापासून ही मुले दिल्ली याठिकाणी अडकून राहिलेले आहेत .यामुळे गेल्या जवळपास पंधरा दिवसापासून विद्यालयाच्या पालक-शिक्षक संघटनेच्यावतीने गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका व इतर अनेक अधिकाऱयांची भेट घेऊन यासंदर्भात मदत करण्याची विनंती करण्यात येत आहे. मात्र आवश्यक स्तरावर अजूनही यासंदर्भात प्रयत्न होत नसल्याचे समोर आले आहे. परिणामी आज काही संघटनेच्या पदाधिकाऱयांनी श्रीपाद नाईक यांची भेट घेतली व त्यांनी यासंदर्भात गांभीर्याने लक्ष देऊन मुलांच्या व्यवस्थे संदर्भात गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती केलेली आहे.









