ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. मागील 24 तासात 1,141 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 139 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 14 लाख 23 हजार 690 वर पोहचली आहे. यामधील 23 हजार 951 वर रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 2,799 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 13 लाख 85 हजार 158 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 23,951 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 90 लाख 81 हजार 127 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 47,917 आरटीपीसीआर टेस्ट आणि 23,936 रैपिड एंटिजेन टेस्ट एका दिवसात करण्यात आल्या आहेत.
दिल्लीत मागील 24 तासात 39,173 लोकांना लस देण्यात आली. यामध्ये 33,729 जणांना पहिला डोस 5,444 जणांना दुसरा डोस देण्यात आला. तर राजधानी दिल्लीत आतापर्यंत एकूण 52 लाख 58 हजार 545 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.









