ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यातच आता दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाळ राय यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, सुरुवातीला सौम्य लक्षणे दिसल्यावर मी माझी कोरोना चाचणी करून घेतली. त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच मागील काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतःची काळजी घ्यावी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने स्वतःची कोरोना टेस्ट करून घ्यावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
दरम्यान, याआधी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन, शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया आदींना कोरोनाची लागण झाली होती.









