ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मागील काही दिवसांपासून कोरोनाशी झुंज देत असलेले दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची शुक्रवारी कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आली असून जैन यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यामुळे आज त्यांना डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता आहे.

गुरुवारी जैन यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत असल्याची माहिती मिळाली होती. मागील 72 तासांपासून त्यांच्या प्रकृतीत ऑक्सिजन सपोर्ट सिस्टीम शिवाय सुधारणा झाली आहे.
दरम्यान, सत्येंद्र जैन यांना 17 जून रोजी कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. यादरम्यान त्यांच्या फुफ्फुसांना संसर्ग झाला. त्यामुळे सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांच्यावर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. अखेर आज पुन्हा केलेल्या टेस्टमध्ये त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत आणि आजच त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येण्याची शक्यता आहे.









