गोडोली / प्रतिनिधी
साईबाबा मंदिर चौकाला अतिक्रमणाचा विळखा, त्यात वाहतूकाची मोठी वर्दळ,रोज किरकोळ अपघातांची मालिका मात्र उपाययोजना नाही. बुधवार सकाळी शालेय विद्यार्थ्यांला दुचाकीची धडक बसल्यावर मोठी गर्दी जमली.भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांसाठी गतीरोधक व्हावेत, अशी मागणी गर्दीतून झाली. त्याची माहिती एकाने अँड. डि.जी.बनकर यांना काँल करून देताच आजचं उपाययोजना करतो,असा शब्द दिला. अँड.डि.जी.बनकर यांनी सकाळी दिलेला शब्द पुर्ण करण्यासाठी रात्रभर संबंधित यंत्रणेच्या सोबत उभे राहून गुरुवारी पहाटेपर्यंत चौकात झेब्रा क्रासींग कामपुर्ण घेतले.
गोडोलीतील साईमंदीर चौकात सकाळी शाळेत जाणाऱ्या एका विद्यार्थ्यांनीला भरधाव दुचाकीचा धडक बसली.तिच्या मदतीला चांगलीच गर्दी झाली. कोणीतरी हि खबर नगरसेवक अँड.डि.जी.बनकर यांना काँल करून सांगितले.त्याचवेळी ‘उपाययोजना आजच करतो’ हा शब्द दिला.
नगरसेवक अँड.डि. जी.बनकर यांना साईमंदीर चौकातील वाहतूक वर्दळ आणि सातत्याने होणारे अपघात माहिती असून त्याबाबत उपाययोजना करण्याचा दिलेल्या शब्दानुसार त्याच दिवशी रात्री ११:३० संबंधित यंत्रणेला घेऊन स्वतः आणि सामाजिक कार्यकर्ते दिनकर मोरे यांनी पहाटे ३ वाजेपर्यंत संपूर्ण चौकात झेब्रा क्रासींग करून दिलेल्या शब्दाप्रमाणे करून दाखवले.









