मुंबई \ ऑनलाईन टीम
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्याबद्दल सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. विविध क्षेत्रातील व्यक्ती, अनेक राजकीय नेते, अभिनेते यांनीही दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यावेळी दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी दिलीप कुमार यांना पहिल्यांदा पाहिल्याचा जेजुरीतील एक किस्साही सांगितला.
अलिकडे दिलीप कुमार यांची प्रकृती बरी नव्हती. रूग्णालयात जाऊन शरद पवार यांनी दिलीप कुमार यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची चौकशीही केली. आज आपल्या मित्राच्या निधनाने शरद पवारही व्यथित झाले आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी त्यांच्या जेजुरीतील पहिल्या भेटीचा एक किस्सा सांगितला.
देशाने एक महानायक गमावला आहे. त्यांच्या अनेक आठवणी माझ्याकडे आहेत. पुण्यातल्या जेजुरीत शुटिंग सुरू होतं. त्यावेळी आम्ही तरुण होतो. दिलीप कुमार यांची क्रेझ होती. शुटिंगची आम्हाला कुणकुण लागल्यावर आम्ही थेट सायकलवरून जेजुरी गाठली. तेव्हा पहिल्यांदा दिलीप कुमार यांना लांबून पाहिलं. नंतरच्या काळात विधिमंडळात राज्य सरकारमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर दिलीप कुमार आणि माझी मैत्री झाली. आमचं वेगळं नातं निर्माण झालं. माझ्या प्रत्येक निवडणुकीत ते माझा प्रचार करण्यासाठी एखाद दुसरी सभा घ्यायचे, असं पवार यांनी सांगितलं.
परदेशातही दिलीप कुमार लोकप्रिय होते. त्याची प्रचिती आम्हाला आली. आम्ही साऊथ ईस्ट देशात गेलो होतो. दिलीप कुमारही सोबत होते. इजिप्तमध्ये आम्ही उतरलो होतो. एका कार्यक्रमानंतर आम्ही बाहेर पडलो. तेव्हा दिलीप कुमार यांना पाहण्यासाठी इजिप्तमधील लोकांनी गर्दी केली होती. इतके ते लोकप्रिय होते. त्यांची लोकप्रियता भारतापुरतीच नव्हती, तर भारताबाहेरही ते लोकप्रिय होते, असं शरद पवार म्हणाले.
दिलीप कुमार यांनी भारत पाकिस्तान, भारत चीन अशा युद्धांच्या दरम्यान भारतीय सैन्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कायम सहकार्य केलं, असंही शरद पवार यांनी सांगितलं.
दिलीप कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना शरद पवार म्हणाले, अलीकडच्या काळात त्यांची प्रकृती ठीक नव्हती. काही दिवसांपूर्वी मी त्यांना भेटूनही आलो होतो. पण मी माझ्या एक जवळच्या स्नेह्याला आज मुकलो. दिलीप कुमार यांना जेवढं आयुष्य लाभलं, त्यात त्यांनी कलेची अखंड सेवा केली. त्यांच्या या सेवेबद्दल आणि त्यांना कृतज्ञ राहायला हवं. मरणानंतर त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांना मी धीर देतो.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








