तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बुधवारी एकही कोरोनाबाधित रुग्ण पॉझिटिव्ह निघाला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांसाठी आजचा दिवस कोरोना अहवाल दिलासादायक ठरला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 215 कोरोबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 115 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी बुधवारी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 120 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील सर्वच अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे दिलासा मिळाला आहे. . 215 रुग्णांपैकी 71 पुरुष 44 स्त्री आहेत. तालुक्यात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 89 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 40
बार्शी – 30
माढा- 7
माळशिरस – 5
मोहोळ -13
उत्तर सोलापूर – 15
करमाळा- 1
सांगोला – 3
पंढरपूर -7
दक्षिण सोलापूर – 94
एकूण – 215
होम क्वांरटाईन – 2238
आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती- 2869
प्राप्त अहवाल- 2834
प्रलंबित अहवाल- 35
एकूण निगेटिव्ह – 2620
कोरोनाबाधितांची संख्या- 215
रुग्णालयात दाखल – 115
आतापर्यंत बरे – 89
मृत – 11
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









