ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा ग्राफ खाली येताना दिसत आहे. मागील 24 तासात राज्यात 20 हजार 740 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर एकूण 31 हजार 671 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 56 लाख 92 हजार 920 वर पोहचली आहे.
दरम्यान, कालच्या दिवशी 424 जणांनी आपला जीव गमावला आहे. गुरुवारी हा आकडा 425 इतका होता. त्यामुळे सद्य स्थितीत राज्यात मृत्यूचे प्रमाण 1.64 % इतके आहे. महाराष्ट्र आतापर्यंत 53 लाख 07 हजार 874 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे होण्याचे प्रमाण 93.24 % इतके आहे.
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 43 लाख 50 हजार 186 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 16.64 % रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 21 लाख 54 हजार 976 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, 16 हजार 078 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 2 लाख 89 हजार 088 इतकी झाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील सक्रिय रुग्णांच्या संख्येतही घट होताना दिसत आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात एकूण 42 हजार 550 इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा 28 हजार 793 इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या 20 हजार 008 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या 14 हजार 593 इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 10 हजार 767 इतकी आहे.








