ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत ओमायक्रॉनचा धोका वाढत असून, आज 10 नव्या रुग्णांची पुष्टी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिल्लीतील ओमायक्रॉनच्या एकूण 20 रुग्णांपैकी 10 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी याबाबत माहिती दिली आहे.
ओमायक्रॉन हा डेल्टा व्हेरिएंटपेक्षा 70 पट अधिक स्प्रेडर असल्याचे सांगण्यात येते. मात्र, तो डेल्टा या व्हेरिएंटएवढा धोकादायक नाही. आतापर्यंत देशात आढळलेल्या ओमायक्रॉनच्या 98 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. तसेच लसीकरण झालेले रुग्ण या व्हेरिएंटच्या संसर्गातून लवकर बाहेर पडत असल्याचे डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांवरुन दिसून येते.









